Home Cities अमळनेर अमळनेर तालुक्यात उन्मेष पाटील यांचा प्रचार; स्मिता वाघ सहभागी

अमळनेर तालुक्यात उन्मेष पाटील यांचा प्रचार; स्मिता वाघ सहभागी

0
37

अमळनेर प्रतिनिधी । जळगाव लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांनी आज अमळनेर तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन मतदारांचा कौल मागितला. विशेष म्हणजे या प्रचार फेरीत आमदार स्मिता वाघ यांनी भाग घेतला.

महायुतीचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांनी आज अमळनेर तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या. यामध्ये सडावण, फाफोरे, शिरुड, मंगरूळ, आरडी, आनोरे,, जवखेडा, वावडे, मांडळ, मुडी, बोदर्डे, बाम्हणे,भिलाली, वासरी, कळमसरे आदी गावांचा समावेश होता. याप्रसंगी त्यांच्यासोबत आमदार शिरीष चौधरी, आमदार स्मिता वाघ, जिल्हा परिषद सदस्या मीना पाटील, सोनूताई पवार, जिजाबराव पाटील, अमोल पाटील, मनीषा परब, शांताबाई पाटील, शुभांगी राणे, बाळासाहेब पाटील, नंदू अहिरे, बापू पाटील, मिलींद पाटील आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार स्मिता वाघ या उन्मेष पाटील यांच्या प्रचारात सहभागी होतील की नाही ? याबाबत सस्पेन्स होता. मात्र या दौर्‍यात स्मिताताई सहभागी झाल्याने या सर्व शंकांना पूर्णविराम मिळाल्याचे मानले जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound