अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील जानवे गावाजवळील भाऊजी पेट्रोल पंपाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने एका ५५ वर्षीय प्रौढ व्यक्तीला जोरदार धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी २८ मार्च रोजी रात्री ८ वाजता घडली आहे या संदर्भात रात्री ११ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबूलाल देवराम शिंगाने रा. रुपजीनगर अमळनेर असे मयत झालेल्या प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की बाबुलाल शिंगाणे हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. शुक्रवारी 28 मार्च रोजी रात्री आठ वाजता ते अमळनेर तालुक्यातील जानवे गावाजवळ पायी जात असताना त्यांना मागून अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांचा मृत्यू झाला दरम्यान या संदर्भात त्यांचा मुलगा गणेश शिंगाणे याने अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात वाहनावरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहे.