पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगांव -छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर वाकोद गावाच्या पुढे हॉटेल सिंहगड जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने एका ४० वर्षीय अनोळखी इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ९ ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे पहूर पोलिसांना कळताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पहुर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला . दरम्यान , शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेहाला ग्रामीण रुग्णालयातच ठेवण्यात आलेले आहे आणि ओळख पटविण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक सचिन सानप केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दीपक सुरवाडे करीत आहे. निर्दयीपणे वाहन चालविणारे वाहन चालक निरपराध नागरिकांचा जीव घेण्यास कारणीभूत ठरत असल्याच्या प्रतिक्रिया सजग नागरिकांमधून उमटत आहेत .