राष्ट्रीय एकात्मता शिबिरासाठी विद्यापीठाचा संघ रवाना

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  इंदिरा गांधी विद्यापीठ, हरियाणा येथे दि १८ जुलै पासून होणा-या राष्ट्रीय एकात्मता शिबिरासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा संघ रवाना झाला.

 

युवा व क्रीडा मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या निर्देशान्वये प्रादेशिक संचालनालय व इंदिरा गांधी विद्यापीठ, मीरपूर (हरियाणा) यांच्या संयुक्त विद्यमाने आझादी का अमृत महोत्सव या विषयावर दि १८ ते २४ जुलै दरम्यान राष्ट्रीय एकात्मता ‍शिबीर होत आहे. महाराष्ट्रातील विद्यापीठांमधून या शिबीरासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची निवड झाली आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचे सहा विद्यार्थी आणि संघ व्यवस्थापक या शिबिरासाठी रवाना झाले.

 

कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, रासेयो संचालक डॉ. सचिन नांद्रे यांनी संघाला शुभेच्छा दिल्या. या संघात अक्षय महाजन (सामाजिकशास्त्रे प्रशाळा), गोविंद जाधव (संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय, मुक्ताईनगर), लालसिंग वळवी (आर. एफ. एन. चे वरिष्ठ विज्ञान महाविद्यालय, अक्कलकुवा), सुवर्णा देसले (श्रीमती विमलबाई उत्तमराव पाटील महाविद्यालय, साक्री), मानसी निकम (आर. एल. महाविद्यालय, पारोळा), पुनम वळवी (आर. एफ. एन. चे वरिष्ठ विज्ञान महाविद्यालय, अक्कलकुवा), या विद्यार्थ्यांचा व डॉ. अनिल बारी (संघव्यवस्थापक) यांचा समावेश आहे. यावेळी डॉ. संजय शिंगाणे, डॉ. मनोज इंगोले, विलास पाटील हे उपस्थित होते. संघाकरिता कैलास औटी व सुरेश चव्हाण, आकाश भामरे, मयुर पाटील, विजय बि-हाडे यांनी परिश्रम घेतले.

Protected Content