बंद केलेली बससेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील प्र.डांगरी येथील अमळनेर आगारकडून ठराविक बसगाड्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी वयोवृद्ध तसेच नोकरदार यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

बाबत सविस्तर वृत्त असे की, अमळनेर तालुक्यातील डांगरी येथे गेल्या काही दिवसांपासून अमळनेर आगरातून नियमितपणे धावणाऱ्या बस बंद केल्या आहेत. परिणामी याचा फटका शालेय विद्यार्थी तसेच नोकरदार व प्रवाशी वर्गाला बसत असून ,विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विशेषतः गावातील युवकांनी ग्राम पंचायत च्या वतीने अमळनेर आगार प्रमुख यांना रीतसर सुमारे 150 ते 200 सह्यांचे पत्र देखील दिले असताना, याकडे एसटी महामंडळाकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे. बंद करण्यात आलेल्या एसटी बसेस ह्या सकाळी साडे दहा,सायंकाळी साडे चार तर पुन्हा साय.सहा वाजेची बस यांचा समावेश आहे. दरम्यान आगार प्रमुखांनी हा विषय गांभीर्याने घेऊन बंद बसेस पुन्हा सुरू कराव्यात अशी मागणी गावकऱ्यानी केली आहे.

Protected Content