संत नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा वृक्षारोपणाने साजरा

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । सावित्रीबाई महिला मंडळातर्फे वृक्षारोपण करून साजरा केला संत नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यात आला.

श्री क्षत्रीय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्था संचलित सावित्रीबाई महिला मंडळाच्या वतीने गणपती मंदिर शिवकॉलनी येथे संत नामदेव महाराजांच्या ६७२ व्या संजीवन समाधी सोहळा निमित्त शाखेच्या वतीने प्रतिमापूजन व कार्यक्रम संपन्न झाला.

शिंपी समाज युवक संघटनेतर्फे आयोजित केलेल्या ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या उपक्रमांतर्गत सावित्रीबाई महिला मंडळतर्फे जासस्वंदाचे वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व तुळशीचे वृक्ष वाटप करून वृक्ष संवर्धनचा संकल्प करण्यात आला. अ.भा. युवकध्यक्ष रुपेश बागुल, जिल्हाध्यक्ष बंडू शिंपी, शहर अध्यक्ष राजेन्द्रकुमार सोनवणे, उपाध्यक्ष विवेक जगताप,  नगरसेविका दिपमाला काळे, राज्य महिला संघटक कुसुम बिरारी, स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुषमा पाटील, अंजली बाविस्कर, मुकुंद मेटकर, सुधीर शिंपी, मनोज देवरे, सुनिल कापूरे, योगेश कापुरे, युवक संघटनाचे जितेंद्र शिंपी, हेमंत शिंपी, चेतन खैरनार, सुमित अहिराव, चेतन नेरपगार, कांतीलाल शिंपी,  निलेश चव्हाण आदींची उपस्थिती होती.

नगरसेविका, दिपमाला काळे यांनी शिंपी समाज युवक संघटना व महिला मंडळाच्या वतीने या अभिनव उपक्रमाचे अभिनंदन केले कार्यक्रम यशस्वी साठी शाखा अध्यक्ष संजय निकुंभ, सल्लागार सुधाकर कापुरे, मोहन सोनवणे,  मनोज भांडारकर, सचिव योगेश शिंपी, महिला मंडळ अध्यक्षा वैशाली भांडारकर,  देवानंद सोनवणे, तुषार शिंपी, जितेंद्र शिंपी सुभाष भांडारकर यांसह कार्यकर्ते व महिला मंडळाच्या सदस्य यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाला परिसरातील समाज बाधंव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश शिंपी, मोहन सोनवणे केले व आभार सुधाकर कापुरे यांनी केले. 

Protected Content