माजी मंत्री खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त कोवीड सेंटरमध्ये मास्कचे वाटप (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त नाथफाऊंडेशनतर्फे गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कोविड सेंटर, शासकीय अभियांत्रिकी व इकरा कोविड सेंटर येथे वाफेचे मशीन, मास्क सॅनिटायझर वाटप करण्यात आले.

कोरोना योद्धा डॉक्टर्स नर्सेस व सफाई कर्मचाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला, तसेच इच्छादेवी चौकातील इच्छादेवी मंदिर येथे गरजवंत व गरजू महिलांना साड्यांचे वाटप यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी आ.सुरेश भोळे, सिंधी पंचायतीचे मंत्री गुरुमुख जगवाणी, महापौर भारती सोनवणे, स्थायी समितीच्या सभापती सुचिता हाडा, नगरसेविका दीपमाला काळे, गायत्री राणे, कैलास सोनवणे, नाथ फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक लाडवंजारी, दीपक फालक, डॉ.अभिषेक ठाकूर, सुनील माळी, दिलीप माहेश्वरी, विनोद मराठे, भगवान सोनवणे, योगेश लाडवंजारी, जमीर शहा, गोटू चौधरी, प्रदीप पाटील, वाहेद खान, उज्वल नाईक, महादू सोनवणे, भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, भाजप गटनेते भगत बालानी आदींची यावेळी उपस्थिती होती.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1056831808099943/

Protected Content