जळगाव प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग व माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करिअर कट्टा’ या विद्यार्थी केंद्रित उपक्रमाविषयी विद्यापीठस्तरीय कार्यशाळा अॅड.एस.ए.बाहेती महाविद्यालयात संपन्न झाली.
या कार्यशाळेमध्ये जळगाव धुळे नंदुरबार येथून कला वाणिज्य विज्ञान व विधी शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्राचार्य आणि प्राध्यापक वृंद उपस्थित होते. त्यांनी ‘करिअर कट्टा’ माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी काय नवनवीन संकल्पना राबवल्या जात आहेत या विषयाची माहिती घेतली.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘करिअर कट्टा’ हा विद्यार्थी केंद्रित नाविन्यपूर्ण उपक्रमाविषयी विद्यापीठस्तरीय बाहेती महाविद्यालय बुधवार दि.१ डिसेंबर रोजी दुपारी एक झालेल्या या कार्यशाळेत युवकांचा सर्वांगीण विकासासाठी असलेल्या ‘करीयर कट्टा’ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रीडा रसिक एज्युकेशन सोसायटीचे सचिव अॅड.रोहन बाहेती, जळगाव विभाग उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ.संतोष चव्हाण, पुण्याच्या माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे, क.ब.चौ.उ.म.वि.जळगाव, करीयर कट्ट्याचे समन्वयक सचिन नांद्रे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल लोहार यांनी कार्यक्रमाविषयी माहितीच्या फलकाचे अनावरण करुन कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
उच्च शिक्षणात आमूलाग्र बदल सुरु आहे. महाराष्ट्रमध्ये बऱ्याच प्रमाणात ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थी यांचा विकास कसा होईल. त्यांना व्यासपीठ कसे उपलब्ध करून देता येईल याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. “स्पर्धा परीक्षा सोबतच इतर विद्यार्थी लहान-मोठे उद्योग सुरु करु शकतील यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. आयएएस अधिकारी किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातील उद्योजक यांची दररोज सायंकाळी पाच ते सहा या वेळेत व विद्यार्थ्यांनी भेट ठरवली जाणार असून त्या माध्यमातून करियर संदर्भात मार्गदर्शक मिळणार आहे.” असे मान्यवरांनी या कार्यशाळेत सांगितले. हा उपक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, समन्वयक गौतम भालेराव, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन राहुल बनसोड आणि मोरेश्वर सोनार यांनी केले.