मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत महाजन यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपराचार्य राजेंद्र चौधरी उपस्थित होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. संजीव साळवे उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उद्घाटनपर भाषणात प्राचार्य महाजन यांनी विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन कुटुंब, समाज व राष्ट्राची उन्नती साधावी असे आवाहन केले. प्राध्यापक साळवे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बहिणाबाई चौधरी अशिक्षित असून सुद्धा मराठी साहित्याच्या जगतात साहित्यसम्राज्ञी बनल्या. त्यामुळे आजच्या युवा पिढीसाठी बहिणाबाई दीपस्तंभ आहेत, त्यामुळे आजच्या युवकांनी कवी, लेखक व वक्ता बनून बहिणाबाईंचा आदर्श घेतला पाहिजे असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य चौधरी यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जीवनपट उलगडला आणि विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला ग्रंथालयाचे अधीक्षक प्रा.सरोदे, प्रा. सौ. देशमुख, प्रा. सौ. खर्चे, प्रा. कोळी उपस्थित व गणेश शिमरे उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल पाटील व विद्यार्थी विकास महिला अधिकारी प्रा.प्रतिभा ढाके यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. दीपक बावस्कर यांनी, तर प्रास्ताविक प्रा.डॉ.ताहीर मीर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. विजय डांगे यांनी केले. फोटोग्राफीचे कार्य बढे यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.