केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उद्या फैजपुरात सभा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महायुतीचे उमेदवार अमोल हरीभाऊ जावळे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा रविवारी १० नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता फैजपूर येथील जे.टी.महाजन इंग्लिश मिडीयम स्कूलचे मैदानात होणारआहे.

रावेर आणि यावल विधानसभेचे महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपाचे आणि महायुतीच्या नेत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत अमित शाहा यांनी जळगाव येथे स्मिताताई वाघ यांच्यासाठी सभा घेतली होती. यानंतर ते आता रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अमोल हरीभाऊ जावळे यांच्या प्रचारासाठी सभा घेणार असल्याचे निश्चित झाले आहे.

Protected Content