यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील यावल भुसावळ मार्गावरील अंजाळे गावाजवळच्या मोर नदीच्या पुलावर चारचाकी वाहनाने दोन मोटरसायकलींना धडक दिल्याने झालेल्या भीषण तिहेरी अपघातात गंभीर जख्मी झालेल्या बालकाचा उपचारा दरम्यान दुदैवी मृत्यु झाला आहे. गुन्हा दाखल करण्याच्या मागणी करीता मृतदेहास ताब्यास घेण्यास नकार दिल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता .
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की यावल भुसावळ मार्गावरील अंजाळे गावाजवळच्या मोर नदी पुलावर १ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास भुसावळ कडून यावल कडे येणाऱ्या चारचाकीने भरधाव वेगाने वाहन चालवित दोन मोटरसायकलींना धडक दिल्याने झालेल्या मोटारसायकलवर मागे बसलेला सोहम शेकोकार (वय १४ वर्ष रा. अंजाळे) या झालेल्या भीषण अपघातात पुलावरून खाली कोसळल्याने गंभीर जखमी झालेल्या बालकाचे भुसावळ येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असतांना दुदैवीरित्या मृत्यु झाला आहे.
मयत झालेल्या मुलाच्या कुटूंब व नातेवाईकांनी जो पर्यंत या अपघातास कारणीभुत असलेल्या चारचाकी वाहनचालकाविरूद्ध मयताच्या मृत्युस कारणीभुत म्हणुन गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करीत मयताचे मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. अखेर पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी भुसावळ येथील रुग्णालयात भेट देऊन संपुर्ण परिस्थितीची माहिती घेत संबधित चारचाकी वाहनचालका विरूद्ध कायद्याशीर गुन्हा दाखल करण्यात येईल असा विश्वास अपघातात मरण पावलेल्या मुलाच्या कुटुंबास दिल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे. त्यामुळे यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे .
अंजाळे पुलावर झालेल्या अपघातातील अल्पवयीन जखमी बालकाचा दुदैवी मृत्यु
11 months ago
No Comments