यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील कासवे शिवारातील शेतात शेतकरी काम करत असतांना सर्पदंश झाला. त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उखा केशव कुऱ्हाडे वडार वय ५८ रा. कासवे ता. यावल असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील कासवे गावात शेतकरी उखा कुऱ्हाडे हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. नेहमीप्रमाणे बुधवारी ४ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास शेतात काम करतांना सर्पदंश झाला. त्यांना तातडीने जळगावा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचारा सुरू असतांना त्यांची प्राणज्योत मालविली. यावेळी नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला होता. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे