विजेच्या धक्क्याने शेतमजूर तरूणाचा दुदैवी मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतात लोंबकणाऱ्या विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून डिकसाई गावातील ३६ वर्षीय शेतमजूर तरूणाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटन डिकसाई शिवारातील शेतात घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राजेंद्र रुपचंद पवार (३६, रा. डिकसाई, ता. जळगाव) या शेतमजुर तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राजेंद्र पवार हा तरूण आपल्या कुटुंबियांसह डिकसाई गावात वास्तव्याला होता. शनिवारी २९ जून रोजी सकाळी ११ वाजता तो गावातील किरण प्रल्हाद महाजन यांच्या शेतात कामासाठी गेले होते. शेतात लोंबकळणाऱ्या विद्युत तारांचा राजेंद्र पवार यांना स्पर्श झाला. विजेचा जोरदार धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. काही वेळानंतर शेतात काम करणाऱ्या मजुरांना पवार हे शेतात पडलेले दिसले. त्यांनी घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. पंचनामा करुन संध्याकाली मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला.

राजेंद्र पवार यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा व आई असा परिवार आहे. काळाने राजेंद्र यांच्यावर झडप घातल्याने दीड वर्षाच्या मुलासह लहानग्या मुलीही पोरक्या झाल्या आहे.

Protected Content