रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रसलपुर (ता.रावेर) येथील प्रसूती झाल्यानंतर अतिरिक्त रक्तस्त्राव झाल्याने एका ३७ वर्षीय महिलेचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात एकच हळहळ व्यक्त होत आहे,
या बाबत वृत्त असे की रसलपुर (ता.रावेर) येथे सजंय महेबुब तडवी यांच्या पत्नी हनिफा सजंय तडवी (वय 37) हया रात्री दहाच्या सुमारास राहत्या घरी प्रसूती झाल्या. त्यानंतर त्यांना अतिरिक्त रक्तस्त्राव सुरू झाला. त्यांना उपचारासाठी रावेर ग्रामीण रुग्णालयात नेत असतांना रस्त्यातच त्यांचा दुदैवी मृत्यु झाला आहे. मयत महिलेला सात मुली नंतर मुलगा झाला होता. यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.