जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील प्रताप नगरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात शालेय हॉकी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी ८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता १९ वर्षीय वायोगटातील संघांमध्ये स्पर्धा घेण्यात आले. यात जिल्हास्तरीय स्पर्धेत मुलांमधून बियाणी स्कूल त मुलींमधून बी.झेड स्कूलने पारितोषिक पटकावले आहे. तर महापालिका स्तरीय स्पर्धे मुलींमधून बेंडाळे महिला महाविद्यालय तर मुलांमधून अँग्लो उर्दू स्कूलने बाजी मारली आहे.
जळगाव जिल्हा कार्यालय आणि जळगाव हॉकीच्या वतीने गेल्या सात दिवसांपासून विविध गटातील खेळाडूंसाठी जिल्हास्तरीय व महापालिकास्तरीय हॉकी स्पर्धेचे आयोजन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी ८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता १९ वर्षीय वायोगटातील संघांमध्ये स्पर्धा घेण्यात आले. यात जिल्हास्तरीय स्पर्धेत मुलांमधून बियाणी स्कूल त मुलींमधून बी.झेड स्कूलने पारितोषिक पटकावले आहे. तर महापालिका स्तरीय स्पर्धे मुलींमधून बेंडाळे महिला महाविद्यालय तर मुलांमधून अँग्लो उर्दू स्कूलने बाजी मारली आहे.
विजयी व उपविजयी खेळाडूंना मान्यवरांच्याहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. याप्रसंगी मिल्लत जुनिअर कॉलेजच्या प्राचार्य हफिफा शाहीन, पोलीस दलाच्या वाहतूक शाखेच्या मेघना जोशी, बेंडाळे महाविद्यालयाच्या प्रा.छाया चीरमाळे, क्रीडा अधिकारी गुरुदत्त चौहान, हॉकी जळगावचे फारुक शेख यांच्यासह मीनल थोरात, मुख्तार सैयद, राहील अहमद, शादाब सय्यद, अरबाज खान, वर्षा सोनवणे, मुजफ्फर खान आदी उपस्थित होते.