Home Cities एरंडोल विनयभंग करून कोयत्याने वार; महिलेसह तिचे पती जखमी

विनयभंग करून कोयत्याने वार; महिलेसह तिचे पती जखमी

0
44


एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील हनुमंतखेडे शिवारातील शेतात महिलेसोबत अश्लिल चाळे करत तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एरंडोल तालुक्यातील एका गावात विवाहिता आपल्या पतिसह वास्तव्याला आहे. मासेमारीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. ३ सप्टेंबर रोजी पिडीत महिला ही आपल्या पतीसह हनूमंतखेडा शिवारातील शेताजवळ मासे पकडण्यासाठी गेले होते. दुपारी ४ वाजेच्या सुमारास एका झाडाखाली महिला बसलेले होते. तिचे पती स्वयंपाकासाठी सरपण घेण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात गेले होते.  दरम्यान, संशयित आरोपी राहूल विष्णू भिल हा तिथे आला. त्यावेळी त्यांने विवाहितेसोबत अश्लिल वर्तन करत तिचा विनयभंग केला. व तिथून निघून गेला. परत थोड्यावेळाने महिला बसलेल्या ठिकाणी हातात कोयता घेवून आला. तिला व तिच्या पतीला कोयत्याने वार करून  गंभीर जखमी करून पसार झाला. हा प्रकार घडल्यानंतर विवाहितेने कासोदा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी राहूल भिल याच्या विरोधात कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नितीन सुर्यवंशी करीत आहे.


Protected Content

Play sound