स्वत:च्या दुखापतीस कारणाभूत; कारण तर जाणून घ्या

शहर पोलीस ठाण्यात पोलिसाच्या फिर्यादीवरुन दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील के. पी. प्राईड हॉटेल परिसरात दारुच्या नशेत भरधाव दुचाकी चालवून स्वत:च्या दुखापतीस कारणीभूत झाल्याची घटना घडली आहे, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पोलिसाच्या फिर्यादीवरुन दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील  गेंदालाल मील मधील आर्यन विजय वाघ या नावाचा तरुण गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दारुच्या नशेत भरधाव वेगाने विना नंबरच्या मोपेड दुचाकीवरुन  के पी प्राईड हॉटेल परिसरातून जात होता, यादरम्यान त्याचा अपघात होवून त्याला दुखापत झाली, तसेच दुचाकीचेही नुकसान झाले, घटनेची माहिती मिळाल्यावर शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठले, पोलिसांनी केलेल्‍या चौकशीत आर्यन हा दारुच्या नशेत असून भरधाव वेगाने दुचाकी  चालविल्याने तो स्वत त्याच्या दुखापतीस कारणीभूत असल्याचे समोर आल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल योगेश इंधाटे यांनी आर्यन विरोधात शरर पोलिसात तक्रार दिली, या वरुन गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय बडगुजर हे करीत आहेत.

Protected Content