बँकेने सील केलेल्या घरात अनधिकृतपणे प्रवेश; दाम्पत्यावर गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गृहकर्जाची घेतलेल्या परतफेड न केल्यामुळे बँकेकडून अर्जुन नगरातील घरावर जप्तीची कारवाई करीत सील केले. मात्र संशयितांनी त्या घरामध्ये अनधिकृतपणे प्रवेश करुन ताबा घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. ही घटना गुरूवारी २० फेब्रुवारी रेाजी दुपारी १ वाजता समोर उघडकीला आली आहे. याप्रकरणी सोमवारी २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता बँक अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दाम्पत्यावर रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील वाघ नगरातील अर्जुन नगरातील हेमंत गंगराम खैरनार यांनी घरावर नाशिक येथील ॲक्सीस बँकेकडून गृहकर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड न केल्याने बँकेने त्याचे घर जप्त करुन सील लावले होते. परंतू गुरूवारी २० फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता बँकेने जप्ती केलेल्या मिळकतीवर अनधिकृतपणे प्रवेश करुन घराचा ताबा घेतल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी २४ फेब्रुवारी रेाजी सायंकाळी साडेसात वाजता संशयित मिनाक्षी हेमंत खैरनार, हेमंत गंगाराम खैरनार दोघ रा. अर्जुन नगर, वाघनगर यांच्याविरुद्ध अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ प्रशांत पाठक करीत आहे.

Protected Content