यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील किनगाव बुद्रूक या ग्रामपंचायतच्या सरपंचपदी काँग्रेसच्या सौ भारती प्रशांत चौधरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे . यावल तालुक्यातील किनगाव बु. ग्रामपंचायतच्या तत्कालीन सरपंच निर्मला पाटील यांनी ग्रामपंचायतच्या सत्ताधारी गटाच्या ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ मंजुश्री गायकवाड यांच्या कडे दिला होता.
तत्कालीन सरपंच निर्मला पाटील यांच्या राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदावर आज दिनांक २४ जुलै रोजी किनगाव बुद्रुक ग्राम पंचायतच्या कार्यालयात मंडळ अधिकारी एस एल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या सर्वसाधारण बैठकीत सरपंचपदी माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी यांच्या नेतृत्वात सौ.भारती प्रशांत पाटील यांची सरपंचपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी किनगाव बु॥ ग्राम पंचायतच्या सदस्या व माजी सरपंच निर्मला पाटील, अलानुरबी तडवी, प्रमोद पाटील, सायरा तडवी, किरण सोनवणे, लुकमान तडवी, सावित्री धनगर, शेख महेमुद, स्नेहल चौधरी, विजय वारे, साधना चौधरी, प्रमिलाताई पाटील,आनंदा माळी, वंदना वराडे व ग्रामविकास अधिकारी प्रदीप धनगर उपस्थित होते. ग्रामपंचायतच्या सरपंचपदी निवड झालेल्या भारती पाटील यांचे माजी आमदार रमेश चौधरी, धनंजय चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य आर. जी. नाना पाटील, यावल पंचायत समितीचे माजी लिलाधर चौधरी, माजी पंचायत समिती सदस्य विलास तायडे, कॉंग्रेस कमेटीचे प्रदेश उपाध्यक्ष जलील पटेल यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते .