एनसीबीने चमकोगिरी न करता सखोल चौकशी करावी- अ‍ॅड. निकम

मुंबई । बॉलिवुडमध्ये घाण असेल तर ती साफ व्हायलाच हवी असे स्पष्ट नमूद करत एनसीबीने चमकोगिरी न करता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी विशेष सरकारी वकिल अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी केली आहे.

राज्याचे विशेष सरकारी वकिल अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सध्या सुरू असणार्‍या अंमली पदार्थांच्या चौकशीबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, एका अभिनेत्रीने संसदेत मध्यंतरी असे भाष्य केले की जिस थाली में खाते हैं उस थाली में ही छेद करते हैं! आता सगळीच तुमची थाली घाणेरडी असेल तर छेद केलाच पाहिजे. एनसीबीने चमकोगिरी न करता या संपूर्ण ड्रग्ज प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी केली पाहिजे. ज्या बॉलीवूड कलाकारांची नावे या ड्रग्ज कनेक्शनमध्ये समोर आली आहेत, त्यांनी मनाची श्रीमंती दाखवून आपण जे कृत्य केले आहे ते कबूल करावे, असेही उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे.

दरम्यान, एनसीबीने केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी अवास्तव दावे करण्यासाठी चमकोगिरी करण्याऐवजी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी देखील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी या मुलाखतीत केली अहे.

Protected Content