मुंबई प्रतिनिधी । देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर आता उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री तर बाळासाहेब थोरात व जयंत पाटील हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे वृत्त आहे.
आज दुपारी देवेंद्र फडणवीस यांनी आपण राजीनामा देत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. यानंतर महाआघाडीच्या सत्ता संपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री तर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे जयंत पाटील हे दोन्ही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. हे तिन्ही मान्यवर कदाचित उद्याच शपथ घेण्याची शक्यता आहे. तर उर्वरित मंत्रीमंडळाचाही लवकरच शपथविधी होणार असल्याचे वृत्त आहे.