महामंडळांवर नव्याने होणार नियुक्त्या

uddhav thackera 11

मुंबई प्रतिनिधी । मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फडणवीसांच्या कालखंडात नियुक्त करण्यात आलेल्या शासकीय आणि अशासकीय मंडळे, महामंडळे आणि समित्यांवरील अध्यक्ष तसेच सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

भाजप सरकारने केलेल्या सदस्यांच्या नियुक्या रद्द करून तातडीने नव्या नियुक्या करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिले आहेत. शासकीय आणि अशासकीय मंडळे, महामंडळे, आणि समित्यांवरील अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाळ हा तीन वर्षांचा असतो. सत्ताधारी पक्षाचे नेते, आमदार आणि पदाधिकार्‍यांना सत्तेत सामावून घेण्यासाठी याचा वापर केला जातो.

या पार्श्‍वभूमिवर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यांच्या आमदार आणि नेत्यांच्या मंडळे, महामंडळे आणि समित्यांवर अध्यक्ष आणि सदस्य म्हणून नियुक्त्या करण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच्या सरकारने नेमलेल्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश मुख्य सचिवांना दिले आहेत. मुख्य सचिव अजोय मेहता यांनी या नियुक्त्या रद्द करण्याबाबत आदेश काढले आहेत. दरम्यान,शासकीय मंडळे, महामंडळे आणि समित्यांवर नव्याने नियुक्त्या करण्यासाठी पात्र सदस्यांच्या माहितीसह प्रस्ताव मुख्य सचिवांना सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांना यात समान वाटा मिळणार आहे.

Protected Content