मुंबई प्रतिनिधी । माझी मुलाखत सुरू असतांना सरकार पाडून दाखवावे असे खुले आव्हान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विरोधकांना दिले आहे. संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीच्या टिझरमध्ये आज त्यांच्या चॅलेंजचा व्हिडीओ समोर आला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली असून याचा पहिला टिझर प्रसिद्ध करण्यात आला आहे, या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडल्याचे दिसून येत आहे. यात ते म्हणाले आहेत की, वयाच्या साठीला मला मुख्यमंत्री पद मिळालं असलं तरी यासाठीच केला होता हट्टाहास असं नाही, हा योगायोग आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून आमचं सरकार जास्त काळ टिकणार नाही, हे सरकार लवकरच पडेल असा दावा केला जातो यावर उद्धव ठाकरेंनी भाजपा नेत्यांना खुले आव्हान दिले आहे.
मी बसलेलोच आहे, माझी मुलाखत सुरु असतानाचा सरकार पाडा अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेत्यांना आव्हान दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपा राज्यातील ठाकरे सरकार पाडणार आहे अशी चर्चा सुरु आहे. यावरून चर्वण सुरू असतांना उध्दव ठाकरे यांनी दिलेले आव्हान आता चर्चेचा विषय बनले आहे.