चेन्नई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | तामिळनाडू सरकारच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात आला आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी राज्यपालांची भेट घेऊन पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. राज्यपालांनी ही शिफारस मान्य केली असून उद्या म्हणजेच २९ सप्टेंबरला चेन्नई येथील राजभवनात उदयनिधी स्टॅलिन यांचा शपथविधी होणार आहे. उदयनिधी हे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आहेत.
मंगळवारी तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी उदयनिधी यांना उपमुख्यमंत्री केले जाऊ शकते असे संकेत दिले होते. तसेच त्यांनी मंत्रिमंडळात देखील बदल होऊ शकतात असे म्हटले होते. त्यानुसार, मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी उदयनिधी यांना उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यासह व्ही. सेंथिल बालाजी, डॉ. गोवी, आर. राजेंद्रन आणि थिरू एसएम नासर यांना मंत्रिमंडळात समावेश करण्याची शिफारस राज्यपालांना केली होती. नवीन मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा रविवारी दुपारी ३.३०वाजता चेन्नई येथील राजभवनात होणार आहे.