उबाठा शिवसेनाच्या ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियानाला सुरूवात !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पक्षबांधणीसाठी आणि नव्या युवकांना संधी देण्यासाठी शिवसेना सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. या अनुषंगाने जळगाव येथील मुळजी जेठा महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बुधवारी ५ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता युवासेना कॉलेज कक्षाच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. या अभियानाचे उद्घाटन शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे आणि युवासेना उत्तर महाराष्ट्राचे विभागीय सचिव विराज कावडीया यांच्याहस्ते फित कापून करण्यात आले.

या कार्यक्रमाला युवासेना कॉलेज कक्षाचे युवाधिकारी प्रीतम शिंदे, शिवसेना उप-महानगरप्रमुख किरण भावसार, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख उमेश चौधरी, तसेच युवासेना कॉलेज कक्षाचे अजय खैरनार, योगेश कोळी, सौरभ बाविस्कर, राजदीप पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

युवासेना कॉलेज कक्षातर्फे जळगाव शहरातील प्रत्येक महाविद्यालयात हे अभियान राबविण्यात येणार आहे. अधिकाधिक युवकांनी या अभियानात सहभागी व्हावे आणि पक्षसंघटनेचा भाग बनावे, असे आवाहन शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. शिवसेनेने नव्या पिढीला संघटनेत सामील करून घेण्यासाठी हा उपक्रम सुरू केला असून, तरुणांना पक्षाच्या धोरणांची माहिती देऊन त्यांना सक्रीय राजकारणात आणण्याचा उद्देश आहे. जळगावमधील विद्यार्थी आणि युवकांनी मोठ्या संख्येने सदस्य नोंदणी करून घ्यावी असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Protected Content