धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दि अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, धरणगाव यांनी आपल्या उत्कृष्ट बँकिंग सेवांसाठी ‘बँको ब्लू रिबन’ पुरस्कार पटकावला आहे. गॅलक्सी आयएनएमए आणि एवीस पब्लिकेशन वतीने आयोजित कार्यक्रमात २०० ते २२५ कोटी रुपये कार्यक्षेत्रातील सर्वोत्तम बँक म्हणून बँकेचा गौरव करण्यात आला. बँकेने हा पुरस्कार सलग पाचव्यांदा पटकावला आहे.

हा मानाचा पुरस्कार रिझर्व्ह बँकेचे निवृत्त महाप्रबंधक बॅनर्जी साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे, सलग पाचव्यांदा हा पुरस्कार मिळवण्याचा बहुमान बँकेने पटकावला आहे, ज्यामुळे बँकेच्या विश्वासार्हतेला आणि उत्कृष्ट कार्यपद्धतीला पुन्हा एकदा मान्यता मिळाली आहे. या गौरवसोहळ्याला बँकेचे चेअरमन प्रवीण कुडे, संचालक दत्ताजी महाजन, सचिन बागुल, मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील गुजराथी आणि बँकेचे अधिकारी ज्ञानेश्वर भामरे यांनी उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारला.
दी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, धरणगाव यांनी ग्राहकसेवा, विश्वासार्हता आणि आर्थिक स्थैर्य यामध्ये सातत्य राखत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यामुळेच सलग पाचव्यांदा ‘बँको ब्लू रिबन’ पुरस्काराचा बहुमान बँकेला मिळाला आहे. बँकेच्या या ऐतिहासिक यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यातही अशीच प्रगती कायम ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.