Home Cities जळगाव नशिराबादजवळच्या अपघातात सावद्याचे दोन तरूण ठार

नशिराबादजवळच्या अपघातात सावद्याचे दोन तरूण ठार

0
53

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबादजवळ झालेल्या अपघातात सावदा (ता. रावेर) येथील दोन तरूण ठार झाल्याची घटना आज घडली.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सावदा येथील आकाश जीवन भिरूड (रा. सावदा) व वैभव दत्तू भिरूडे हे दोन्ही तरूण जळगावहून सावदा येथे जात होते. रात्री साडेआठच्या सुमारास त्यांना ट्रकने जोरदार धडक दिली. यात त्या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यातील आकाश भिरूड याचा २० एप्रिल रोजी विवाह होता. तर वैभव हा त्याच्या काकांचा मुलगा होता. एकाच घरातील या दोन्ही तरूणांच्या अपघाती मृत्यूमुळे भिरूड कुटुंबावर आघात झाला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत याबाबत नशिराबाद पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound