चांद्रयान-२ मोहिमेचे नेतृत्व दोन महिला करणार !

1 107373793 4b71725e f5e8 436d bf70 ff6ab6cbdfec

श्रीहरिकोटा, वृत्तसंस्था | चांद्रयान-२ मोहिमेद्वारे भारत अंतराळात इतिहास रचणार आहे. याशिवाय ही भारताची पहिली अशी अवकाश मोहिम असेल, जिचे नेतृत्व दोन महिला वैज्ञानिक करणार आहेत. वनिता मुथय्या आणि रितू धारीवाल अशी या दोन महिलांची नावे आहेत. वनिता मुथय्या भारताच्या चांद्रयान-२ च्या प्रकल्प संचालक आहेत, तर रितू मोहिम संचालक आहेत.

 

वनिता डेटा हँडलिंग एक्सपर्ट आहेत. समस्या सोडवणे आणि चमूचे उत्तम पद्धतीने नेतृत्व करण्याची क्षमता वनिता यांच्याकडे आहे. यापूर्वी त्यांनी चांद्रयान-१ मोहिमेवरदेखील काम केले आहे. त्यांच्यावर चांद्रयान-२ मोहिमेच्या प्रक्षेपणापासून मोहिम पूर्ण होईपर्यंतची सर्व जबाबदारी देण्यात आली आहे. रितू  यांनीही अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये सहभाग घेतला आहे. यापूर्वी त्या चांद्रयान-१ मध्ये डेप्युटी ऑपरेशन्स डायरेक्टर होत्या. चांद्रयान मोहिमेच्या टीमच्या क्षमतेबाबत इस्रोचे अध्यक्ष के. सिवन म्हणाले, ‘कोणत्याही कामाच्या मर्यादा ठरवणे कठिण आहे. इस्रोचे एकूण १७,००० कर्मचारी आहेत. यापैकी प्रत्येकाचे मोहिमेसाठी काही ना काही योगदान असते.’ चांद्रयान-२ मोहिमेसाठी एकूण ३०० जणांची टीम मेहनत घेत आहे. यात २० ते ३० टक्के महिला आहेत, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.

Protected Content