चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे गावातील एकाच्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्या घटनेत त्यांनीच एकाचा मोबाईल लांबविला होता. या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींना मेहुणबारे पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनिल विश्वनाथ निकम (वय-४२) रा. मेहुणबारे ता.चाळीसगाव हे आपल्या परिवारास वास्तव्याला आहे. २३ जुलै रोजी पहाटे ४ वाजेच्या समारास त्यांच्या घरात संशयित आरोपी अब्दुल रहेमान मुश्ताक अहमद आणि सैय्यद दानीश सैय्यद फारूख दोन्ही रा. मालेगाव यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला तर गावातील गोकुळ छोटू शार्दूल यांच्या घरातून मोबाईल लांबविल्याची घटना घडली होती. या प्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवत संशयित आरोपी अब्दुल रहेमान मुश्ताक अहमद आणि सैय्यद दानीश सैय्यद फारूख या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून दुचाकी आणि दोन चाकू हस्तगत केले आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार शामकांत सोनवणे करीत आहे.