जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील किनोद येथील २५ वर्षीय तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता घडली होती. याप्रकरणी शनिवारी ३ जुलै रोजी दुपारी १ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिपक हरी पाटील वय २५ रा किनोद ता.जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे.खासगी नोकरी करून ते आपला उदरनिर्वाह करतात. १४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीबी ८९१) ही घरासमोर पार्कींगला लावलेली असतांना अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. ही घटना उघडकीला आल्यानंतर त्याने दिपक पाटील यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर शनीवारी ३ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ दिपक चौधरी हे करीत आहे.