ममुराबाद रोडवर उभ्या दुचाकीला वाहनाची धडक; एक जखमी

जळगाव प्रतिनिधी । जळगाव ममुराबाद रोडवर रस्त्यालगत दुचाकीसह उभ्या भांडे व्यावसायिकाला वाहनाने धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात एकजण जखमी झाला असून याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध  गुन्हा दाखल झाला.

जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील शेख सलीम शेख गणी  वय ३७ हे गावोगावी जावुन भांडे विक्री करतात. सोमवारी शेख सलीम हे त्यांच्या (एमएच १९ डीके ९०२४) या क्रमांकाच्या दुचाकीने ममुराबादकडे जात होते. यादरम्यान रस्त्याच्या बाजूला दुचाकी उभी करून भाड्याच्या गाठोडे व्यवस्थित करीत असतात जळगावहून ममुराबादकडे जाणार्‍या (एमएच १९ डीटी ९४९५) या वाहनाने शेख सलीम यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकेनंतर शेख सलीम हे  दुचाकीसह रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. यात त्यांच्या छाती सह कमरेला मुकामार लागला असून उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. अपघातानंतर वाहनधारक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी शेख सलीम यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी दुचाकीस धडक देणार्‍या  (एमएच १९ डीटी ९४९५) या क्रमांकाच्या वाहनावरील अज्ञात चालकाविरोधात  तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस नाईक विलास शिंदे हे करीत आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!