जळगाव प्रतिनिधी । हॉटेल समोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत माहिती अशी की, मिलींद संतोष सोनवणे (वय-28) रा. कानळदा रोड, जळगाव नवीन बसस्थानकाजवळ आलेल्या हॉटले सुयोग येथे आले. हॉटेल समोर 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.30 दुचाकी क्रमांक (एमएच 19 बीझेड 2419) काम आटोपल्यानंतर पुन्हा 3.30 वाजता दुचाकीजवळ आल्याने त्यांना दुचाकी मिळून आली नाही. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जिल्हा पेठ पोलीस कर्मचारी करीत आहे.