Home Cities जळगाव डॉ. राधेश्याम चौधरी यांना पितृशोक 

डॉ. राधेश्याम चौधरी यांना पितृशोक 

0
199


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि सृष्टी हॉस्पिटलचे संचालक डॉ. राधेश्याम चौधरी यांचे वडील, धर्मराज चंपालाल चौधरी (डी. सी. चौधरी) यांचे गुरुवारी (२ एप्रिल) सायंकाळी ६.३५ वाजता निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते आणि शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ते ओळखले जात होते.

कै. डी. सी. चौधरी हे भाटपुरा (ता. शिरपूर, जि. धुळे) येथील हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून अनेक वर्षे सेवा देत आले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि शिक्षण क्षेत्रात उच्च प्रतीची नावे मिळवली. त्यांच्या निधनाने शिक्षण तसेच सामाजिक क्षेत्रातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्यांच्या पश्चात जळगावचे डॉ. राधेश्याम चौधरी, भाटपुर्याचे माजी सरपंच शैलेंद्र चौधरी आणि चोपडा येथील सृष्टी सीड्स व फर्टिलायझर्सचे संचालक नितीन चौधरी ही तीन मुले तसेच सुना आणि नातवंड असा कुटुंब आहे. कुटुंबीय आणि समाजातील अनेकांनी त्यांच्या योगदानाचे स्मरण करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.

कै. डी. सी. चौधरी यांची अंत्ययात्रा शुक्रवार, ३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता त्यांच्या भाटपुरा येथील राहत्या घरून निघणार आहे.


Protected Content

Play sound