दुचाकी चोरीतील सराईत गुन्हेगार जेरबंद; 9 दुचाकी हस्तगत

Two wheelar news

जळगाव प्रतिनिधी । गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून दुचाकी चोरून ग्रामीण भागात कमी किंमतीत सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्याच्या ताब्यातील 9 दुचाकी जप्त केल्या आहेत.

याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरात मोटारसायकल चोरीचे गुन्हे मोठ्या प्रमाणावर उघडकीस आले आहे. गेल्या आठवड्यात सहा जणांकडून तब्बत 17 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या होत्या. ही घटना ताजी असतांना आज स्थानिक गुन्हे शाखेने पिंप्राळा येथून संशयित आरोपी वैभव उर्फ दयावान देविदास बैरागी (वय-26) रा.कुंझर ता.चाळीसगाव याला ताब्यात घेतले. त्याने त्याच्या ताब्यातील 9 मोटारसायकली काढून दिल्या आहेत. तर उर्वरित 4 दुचाकी ह्या पुण्याला विकण्यात आले असून त्यासाठी पुण्यात पथक रवाना झाले आहे.

यापुर्वी संशयित आरोपी याने जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील 14 गुन्हे केलेले असून गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला होता. त्याची अधिक चौकशी केली असता त्यांनी दोन वर्षांत केलेल्या एकुण 27 गुन्हे दाखल आहे. यातील 13 गुन्ह्याची कबुली दिली आहे. यावेळी सफौ पोहेकॉ विजयसिंग पाटील विनोद पाटील, शरद भालेराव, अनिल देशमुख, रामकृष्ण पाटील, राहुल पाटील, परेश महाजन, विनय देसले, मुरलीधर बारी, अशोक महाजन, रविंद्र गिरासे, दिनेश बडगुजर, दत्तात्रय बडगुजर, जितेंद्र पाटील, किरण चौधरी, दिपक पाटील यांनी कारवाई केली.

Protected Content