प्रफुल पटेल यांना पुन्हा ईडीकडून समन्स

 

 

मुंबईः वृत्तसंस्था । प्रफुल पटेल यांना पुन्हा एकदा ईडीकडून  इक्बाल मिर्ची प्रकरणात समन्स बजावला जाणार असून, त्यांना ईडी कार्यालयात आता हजेरी लावावी लागणार आहे.

 

यापूर्वीसुद्धा प्रफुल पटेल  यांना समन्स पाठवण्यात आला होता, मात्र तेव्हा ते ईडी कार्यालयात गेले नव्हते. यामुळे त्यांना पुन्हा समन्स पाठवला जाणार असल्याची माहिती मिळालीय. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा साथीदार इक्बाल मिर्ची याच्यासोबतच्या आर्थिक आणि जमीन व्यवहार प्रकरणात त्यांचं नाव समोर आलं होतं. त्यामुळेच ईडीनं त्यांना समन्स बजावून चौकशीसाठी बोलावल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय.

 

ड्रग्स माफिया इक्बाल मिर्चीचं आयएसआयशी कनेक्शन असल्याचं ईडीच्या तपासात उघड झालं   ईडीने   एक आरोपपत्रं दाखल केलं होतं. मिर्चीची बायको हाजरा आणि मुले जुनेद आणि आसिफ यांच्यासह आणखी काही जणांवर हे आरोपपत्र दाखल करण्यात आले होतं. या आरोपपत्रातून ही बाब उजेडात आली असल्याचं सूत्रांनी सांगितलं होतं.

 

 

ऑक्टोबर  २०२० मध्ये ईडीने इक्बाल मिर्चीच्या घरावर कारवाई केली होती. यावेळी ईडीने त्याची प्रचंड संपत्ती जप्त केली होती. ईडीने जप्त केलेल्या या संपत्तीत एक सिनेमागृह, हॉटेल, निर्माणाधीन हॉटेल, एक फार्महाऊस, दोन बंगले आणि पाचगणीतील   साडे तीन   एकरच्या जमिनीचा समावेश आहे. यापूर्वी ईडीने इक्बाल मिर्चीची ७७६ कोटींची संपत्ती जप्त केली होती. त्यात २०३ कोटींच्या विदेशातील संपत्तीचाही समावेश होता. त्यामुळे आता इक्बाल मिर्ची आणि त्याच्या कुटुंबीयांची एकूण ७९८ कोटीची जप्त झाली होती.

 

 

ईडीने   इक्बाल मिर्ची आणि इतरांची पीएमएलए अंतर्गत चौकशी   केली होती.   कपिल वाधवान, धीरज वाधवान आणि हुमायूँ मर्चंटसह पाच जणांना अटक करण्यात आली होती. पीएमएलएच्या विशेष न्यायालयात   तक्रार दाखल केली होती.  . मनी लॉन्ड्रिंगप्रकरणात सहभागी असल्याप्रकरणी इक्बाल मिर्चीचे दोन्ही मुले, आसिफ मेमन, जुनैद मेम आणि पत्नी हाजरा मेमनच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं होतं.

Protected Content