मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कोथळी येथील श्री संत मुक्ताई समाधी स्थळाच्या गाभार्यात ठेवण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातर्फे दोन टॉवर एसी भेट म्हणून देण्यात आले.
श्री.संत मुक्ताबाई समाधी स्थळ (मुळ मंदिर, कोथळी) श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथे मंदिर गाभार्यात भाविकांची होणारी प्रचंड गर्दी यामुळे उन्हाळ्यात खूपच उकड्याची परिस्थिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी अंतर्धान सोहळ्याच्या दिवशी पाहिली होती. त्यावेळी त्यांनी येथे दोन मोठे टॉवर एअर कंडीशनर स्व खर्चातून बसवून देतो असे आश्वासन दिले होते. हा शब्द पाळत त्यांनी बुधवारी प्रत्येकी ३ टन क्षमतेचे दोन टॉवर एसी मंदिरास भेट दिले. यावेळी त्यांची कन्या सौ. प्रियंका सुरज पाटील , सुपुत्र हर्षराज पाटील यांचे हस्ते पुजन करण्यात आले.
याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील यांचे जावई सुरज पाटील , देवस्थानाचे व्यवस्थापक उद्धव जुनारे महाराज, कीर्तनकार दुर्गाताई संतोष मराठे, छोटू भोई, अफसर खान, गणेश टोंगे, पंकज राणे, योगेश राणे, गोपाळ सोनवणे, प्रवीण विटकरे, वसंत भलभले, महेंद्र मोंढाळे, नगरसेवक आरिफ आझाद, पियूष मोरे, मुकेश वानखेडे, युनूस खान, निलेश शिरसाट, निलेश मेढे,सचिन भोई, कृष्णा पाटील, संतोष मराठे , शुभम शर्मा, ललित काठोके, संतोष माळी, रितेश सोनार , गौरव नाईक आदींसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.