रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर शहरात मध्यरात्री निर्दयीपणे गायींची तस्करी करणारे वाहन पोलिसांनी पकडले. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. सुमारे दोन लाख साठ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टाटा मॅजिक (क्र. MH01BR 1143) या वाहनामध्ये बाहेरगावा वरून येऊन दोन गायी व एका वासराला निर्दयतेने बांधून जुना सावदा रस्ताने रावेर शहरातुन सावदाकडे वाहतुक करीत असताना रावेर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार महेश महाजन यांच्या फिर्यादीवरून गाडी चालक सय्यद गफुर व त्याचा साथीदार मनोज महाजन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या गायींना गोशाळेत हलवले असून पुढील तपास पोलीस हवालदार विष्णू भील करत आहेत. या कारवाईमुळे प्राण्यांची तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.