जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील टागोर नगरात घराचा हिस्सा देण्यावरून वाद होऊन चार जणांनी ८० वर्षीय वृध्द महिलेसह दोन जणांना मारहाण करत चाकूनेही दुखापत केली. ही घटना रविवारी रात्री टागोरनगरात घडली. याप्रकरणी रात्री ११.३० वाजता जिल्हापेठ पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, आरुस्तुलबी मासूम पिंजारी (वय-८०, रा. कोळगाव, ता. भडगाव) या वृध्द महिलेसोबत रविवारी १ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता या घराचा हिस्सा देण्यावरून वाद झाला. तो वाढत जाऊन आरुस्तुलबी पिंजारी यांना संशयित आरोपी दानिश सलीम पिंजारी, अमन सलीम पिंजारी, सलिम मासूम पिंजारी आणि शबनमी सलीम पिंजारी सर्व रा. टागोर नगर यांनी शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली. तसेच त्यांचे नातेवाईक आयुब आणि मुस्ताक यांना देखील चाकूने दुखापत करण्यात आली. याप्रकरणी रात्री ११.३० वाजता आरुस्तुलबी पिंजारी यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या दानिश सलीम पिंजारी, अमन सलीम पिंजारी, सलिम मासूम पिंजारी आणि शबनमी सलीम पिंजारी सर्व रा. टागोर नगर, जळगाव गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ वंदना राठोड करीत आहेत.