राष्ट्रवादीचे दोन आमदार बेपत्ता : पोलिसात तक्रार दाखल

मुंबई प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा आणि नितीन पवार हे बेपत्ता झाले असून त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसात धाव घेतली आहे.

कालच्या सत्तानाट्यात अजित पवार यांच्यासोबत असणारे बहुतांश आमदार सायंकाळी उशीरा झालेल्या पक्षाच्या बैठकीत परतले. मात्र काही जणांशी अजूनही संपर्क होऊ शकलेला नाही. यातील शहापूरचे आमदार दौलत दरोडा आणि कळवणचे आमदार नितीन पवार यांचा समावेश आहे. या दोन्ही आमदारांनी अगदी त्यांच्या कुटुंबियांनाही संपर्क केला नसल्याने ते चिंतेच पडले आहे. यामुळे या दोन्ही आमदारांच्या मुलांनी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे.

Protected Content