मुलाच्या अकाली अंतानंतर आता वडीलांचा अकस्मात मृत्यू : थोरगव्हाण गावात शोककळा !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील थोरगव्हाण गावात राहणाऱ्या तरुणांने काही महीन्यापुर्वी गळफास घेत आत्महत्या केली असता आता त्याच्या वडीलाचा अचानक मृत्यु झाल्याची घटना घडली असुन परिसरात शोककळा पसरली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विनोद पांडुरंग पाटील वय-४९, रा, थोरगव्हाण ता.यावल हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. १९ जुलै रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास दहिगाव शिवारातील रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत मिळुन आले. त्यांना तात्काळ उपचारासाठी यावलच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. मृत घोषीत केल्याची घटनासमोर आली आहे.

महीन्यांपुर्वी मयत पाटील यांचा मुलगा याने देखील गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवली होती. आधी मुलाने आत्महत्या केली नंतर आता वडिलांचा अचानक मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबासह संपुर्ण गाव परिसरात शोककळा पसरली आहे. मयत विनोद पांडुरंग पाटील यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले आहे. या घटनेची खबर मयताचे प्रमोद पाटील यांनी यावल पोलीस ठाण्यात दिल्याने अक्समात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉस्टेबल अर्जुन सोनवणे करीत आहे.

Protected Content