साईबाबा नगरातून दुचाकीसह दोन मोबाईल लांबविले

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धरणगाव शहरातील साईबाबा नगरातून दुचाकीसह दोन मोबाईल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गुरुवारी ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता घडली होती. याप्रकरणी शुक्रवारी ९ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, राम गुलाब कदम वय-३० रा.साईबाबा नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ७ फेब्रुवारी रात्री ९ ते ८ फेब्रुवारी सकाळी ८ वाजता दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी (एमएच ३८ एबी २९९६) आणि राजस्थानी कारागिरांचे दोन मोबाईल असा एकूण ४७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून दिल्याची घटना उघडकीला आली आहे. या संदर्भात शुक्रवार ९ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्र पाटील हे करीत आहे.

Protected Content