मध्यरात्री घरातून दोन मोबाईल रोकडची चोरी

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात राहणाऱ्या तरुणाच्या घरातून अज्ञात चोरट्याने दोन मोबाईल आणि पाच हजार रुपयांची रोकड असा एकूण ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे समोर आले आहे. या संदर्भात गुरुवार ३ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव शहर पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शेख अनवर शेख सईद (वय-२४) रा.गेंदालाल मिल, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून हात मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. ३ ऑगस्ट रोजी रात्री बारा ते पहाटे सहा वाजेच्या दरम्यान त्याच्या घरातून अज्ञात चोरट्याने ५ हजार रुपयांची रोकड आणि दोन मोबाईल असा एकूण ३० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर शेख अनवर याने परिसरात शोध घेतला, परंतु काहीही माहिती मिळाली नाही. अखेर गुरुवार ३ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोहेकॉ भास्कर ठाकरे करीत आहे.

Protected Content