महावितरणच्या विद्यूत तारांची चोरी

भुसावळ -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  महावितरण कंपनीच्या मालकीच्या ६५ हजार रुपये किमतीच्या अल्युमिनियमच्या विजेच्या तारांची चोरी केल्याची घटना भुसावळ तालुक्यातील कन्हाळा आणि किन्ही शिवारातील शेतात घडली आहे. या प्रकरणी गुरुवारी ३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील कन्हाळा आणि किन्ही शिवारात महावितरण कंपनीच्या मालकीचे इलेक्ट्रिक डीपी बसविण्यात आले आहे. या ठिकाणी महावितरण कंपनीसाठी लागणारे अल्युमिनियमच्या विजेच्या तारा ठेवण्यात आल्या होत्या. १ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता ते ३  ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान कन्हाळा आणि किन्ही शिवारातील शेतात ठेवलेले व ईलेक्ट्रीक डीपीसाठी लागणारे ६५ हजार रुपये किंमतीचे अल्यूमिनिअमच्या विद्युत तारा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. हा प्रकार उघडकिला आल्यानंतर महावितरण कंपनीच्या कर्मचारी कविता सोनवणे यांनी भुसावळ तालुका पोलिसात चोरी झाल्याबाबत तक्रार दिली. त्यांनी दिलेले तक्रारीनुसार गुरुवार ३ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश राठोड करीत आहे.

Protected Content