मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपली रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. सर्वच पक्ष विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेत आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपावरुन रस्सीखेच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपले दोन उमेदवार देखील जाहीर करत आघाडी घेतली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते शिरीष सावंत यांनी याबाबत पत्रक जारी करत सांगितले की, राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा सुरु आहे. आज ५ ऑगस्ट सोमवार रोजी सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे राजसाहेब ठाकरे यांनी मनसेच्या दोन विधानसभा उमेदवारांची घोषणा केली आहे. शिवडी विधानसभा मतदारसंघातून बाळा नांदगांवकर आणि पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात येत आहे.