सिलिंडर स्फोटामुळे दोन मजली इमारत कोसळून ११ ठार

building collapsed

लखनऊ, वृत्तसंस्था | उत्तर प्रदेशातील महू येथे आज (दि.१४) सकाळी सिलिंडरचा स्फोट होऊन दोन मजली इमारत कोसळली. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे १५ लोक जखमी झाले आहेत. हा स्फोट इतका मोठा होता की, ही दोन मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली. अनेकजण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर शोक व्यकत केला असून जखमींवर तत्काळ योग्य ते उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, महू येथील मोहम्मदाबाद कोतवाली क्षेत्रातील वलीदपूर भागात ही घटना घडली. एका घरातल्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटामुळे संपूर्ण दोन मजली इमारतच कोसळली. हे इतकं अचानक झालं की, लोकांना जीव वाचविण्याची संधीच मिळाली नाही.

स्फोटाचा आवाज ऐकताच एकच गोंधळ उडाला अन आसपासच्या घरातले लोकही घराबाहेर येऊन पळू लागले. लोकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. ढिगाऱ्याखाली अजूनही काही लोक अडकले असण्याची शक्यता आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्य सुरू आहे.

Protected Content