घरातून महागडे दोन मोबाईल लांबविले

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जामनेर शहरातील महावीर नगरातील एका घरातून २ मोबाईल आज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

हेमंत शांताराम वाणी (वय-४८) रा. महावीर मार्ग, जामनेर हे हॉटेल व्यवसायिक आहे. बुधवार २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ ते ८.३० दरम्यान त्यांच्या घरात असलेल ४५ हजाराचे दोन मोबाईल आज्ञात चोरट्याने चोरून नेले. त्यांनी घरात सर्वत्र मोबाईलचा शोध घेतला. परंतु मोबाईल कुठेही मिळून न आल्याने अखेर त्यांनी जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल साहिल तडवी करीत आहे.

 

Protected Content