तरुणाच्या घरातून दोन महागडे लॅपटॉप लांबविले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील मानराज स्पार्क परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचे घरातून ५० हजार रुपये किमतीचे दोन लॅपटॉप चोरून नेल्याची घटना शुक्रवारी ५ जुलै रोजी पहाटे सव्वापाच वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी दुपारी १.३० वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगाव शहरातील मानराज पार्क परिसरातील निलय बिमल राठी (वय २३) हा तरुण वास्तव्याला आहे. शुक्रवार ५ जुलै रोजी पहाटे सव्वा पाच वाजेच्या सुमारास त्यांच्या घरात चोरट्याने अनधिकृतपणे प्रवेश केला. त्यानंतर तेथून ५० हजार रुपये कंमतीचे दोन लॅपटॉप चोरुन नेले. ही घटना उघडकीस असल्यानंतर राठी याने संपुर्ण परिसरात शोध घेतला, मात्र तरी देखील त्यांना लॅपटॉप संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर शुक्रवारी ५ जुलै रोजी दुपारी १.३० वाजता त्यांनी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक हेमंत कळसकर हे करीत आहे.

Protected Content