भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ शहरातून गावठी कट्टे जप्त करण्याच्या कारवाईला वेग आला असून आता शहर पोलिस स्थानकाच्या पथकाने दोन कट्टे व जीवंत काडतुसे जप्त केली आहेत.
एकीकडे कोरोनाचा कहर असतांना भुसावळ शहरात शस्त्र जप्त करण्याचे सत्र सुरू झाले आहे. पोलिसांनी गावठी कट्टे बाळगणार्यांवर कारवाई सत्र सुरु केले आहे. या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके व उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांचे मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे शहरात शस्त्र शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे. याच्या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि स्वप्नील नाईक,पोहेकॉ रविंद्र पाटील, पोना चिंचोले, पोकॉ दीपक मेढे, पोकॉ नरेंद्र वारुळे, भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे पोहेकॉ साहिल तडवी, पोहेकॉ मोहम्मद अली सैय्यद, पोहेकॉ संजय पाटील,पोना सुनील सौंदाणे,पोकॉ जुबेर शेख,पोकॉ सोपान पाटील,पोकॉ जितेंद्र सोनवणे अशांनी मिळून कारवाई केली.
यात अवैध बेकायदेशीर शस्त्रसाठा आरोपी नवीन सुरेश लोखंडे यांच्याकडून एक गावठी कट्टा तर राहुल उर्फ बाळा डिगंबर सोनवणे यांच्या सांगण्यावरून निलेश चंद्रकांत ठाकूर आणि निखिल सुरेश राजपूत यांच्या ताब्यातून एक गावठी कट्टा व २ जिवंत काडतुस असे जप्त करण्यात आले आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.