कोरोना बाधीताच्या अंत्यसंस्कारासाठी फरफट; दात्यांनी पुढे येण्याचे आवाहन

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या संसर्गाने मृत झालेल्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी अनेकांची फरफट होत असल्याने समाजातील दात्यांनी पुढे येण्याचे आवाहन लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी केले आहे.

store advt

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पाचोरा तालुक्यातील प्रौढाच्या मुलाजवळ अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे नसल्याने पा-सहा तास मृतदेह पडून राहण्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी घडला. या प्रकाराची माहिती मिळताच लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी पुढाकार घेतला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी देखील सूचना देऊन यंत्रणा गतीमान केली. परिणामी, त्या व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, अनेक मयत रूग्णांच्या आप्तांकडे अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने त्यांची फरफट होत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे कुणाचीही फरपट होऊ नये म्हणून जिल्ह्यातील दात्यांनी पुढे येण्याचे आवाहन प्रतिभा शिंदे यांनी केले आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा. तसेच ज्या कोरोना बाधित मृताच्या नातेवाइकांची आर्थिक परिस्थिती नसेल अशा बाधितांवरील अंत्यसंस्काराचा खर्च प्रशासनातर्फे करण्यात यावा अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!