चीनी गुगलवर भारतात बंदी !

नवी दिल्ली वृत्तसंस्था । चीनी गुगल म्हणून ख्यात असणारे सर्च इंजिन बायडू व वेईबो या संकेतस्थळांवर केंद्र सरकारने बंदी आणली आहे.

केंद्र सरकारने आधीच महत्वाचे चीनी अ‍ॅप्स आणि अन्य डिजीटल टुल्सवर बंदी आणली आहे. यात अतिशय लोकप्रिय झालेल्या टिकटॉकचा समावेश होता. यानंतर अजून काही अ‍ॅप्सवर बंदी येणार असल्याचे वृत्त मध्यंतरी आले होते. या अनुषंगाने केंद्र सरकारने आज वेईबो आणि बायडू या चीनी संकेतस्थळांना बॅन करण्याची घोषणा केली आहे.

बायडूला चीनी गुगल म्हणून संबोधिले जाते. हे अतिशय लोकप्रिय असे सर्च इंजिन आहे. तर वेईबो ही मायक्रो-ब्लॉगींग साईट आहे. या दोन्ही साईटचा भारतातीय युजर बेस देखील मोठ्या प्रमाणात होता. यामुळे आता केंद्र सरकारच्या बंदीमुळे चीनला पुन्हा एक दणका बसल्याचे मानले जात आहे.

Protected Content